वाशीम : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विविध आस्थापने अंतर्गत असलेल्या वर्ग एक व दोनच्या अधिकार्यांची पदे बर्याच कालावधीपासून रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचार्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत असून नागरीकांची कामेदेखील खोळंबली आहेत. अपुर्या अधिकार्यामुळे विकासकामांना खिळ बसली असून ही सर्व पदे एक महिन्याच्या आत भरावी, अन्यथा अध्यक्षासह सर्वच्या सर्व ५२ जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसतील, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी थेट मुख्य सचिव यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाठी जनकल्याणाची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात. जिल्हयाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते. परंतु येथील जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि.यं, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामन्य प्रशासन विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, वित्त विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उप अभियंता २, कार्यकारी अभियंता, उप अभियंता २, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता, उप अभियंता २, उप अभियंता यांत्रिकी, सहाय्यक भुवैद्यानिक, कनिष्ठ भुवैद्यानिक, जलसंधारण विभागातील जिल्हा जलसंधारण अधिकारी, उप जिल्हा जलसंधारण अधिकारी, उप विभागीय जलसंधारण अधिकारी ४, आरोग्य विभागातील वर्ग एकचे सात पदे रिक्त आहेत.
कृषी विभागातील वर्ग दोनचे २ पदे रिक्त आहेत. पशुसवंर्धन विभागातील वर्ग दोनची ८ पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभाग प्राथमिक येथे वर्ग दोनचे १४ पदे रिक्त आहेत. समाजकल्याण विभागातील वर्ग एकचे २ पदे असु एकुण वर्ग एक व वर्ग दोनचे ६४ पदे रिक्त आहेत.
तर गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशीम मानोरा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर येथील वर्ग एकचे ५ पदे रिक्त आहेत. एकिकडे शासन गतिमान प्रशासन देण्याचा कांगावा करीत असले तरी वाशीम जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे पदे रिक्त असल्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे. यामुळे जलतगीने होणारी कामे थंडबस्त्यात पडली आहेत. जे अधिकारी कार्यरत आहेत. त्या अधिकारी, कर्मचार्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यत पोहचविण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरीकांतून रोष व्यक्त केला जात आहे. रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.
परंतु याबाबत अद्यापही कोणतीच दखल घेतली गेली नसल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षासह सर्वच जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींना निवेदनाच्या प्रतिलिपी देण्यात आलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- नाथाभाऊंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊच देणार नाही – सुधीर मुनगंटीवार
- एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जयंत पाटलांचे मोठे विधान
- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण
- ‘कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा’
- पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ
- शेतकऱ्यांचा दिवाळी साजरा करण्याचा मानस होता पण होत्याचे असे नव्हते झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

