Share

पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ

Published On: 

नाशिक : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधातील मुलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतुने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा जाणीवपूर्वक आढावा घेतला असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव एन.व्ही. शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, अधिक्षक अभियंता अरुण नाईक, (अहमदनगर) अधीक्षक अभियंता आमले, (धुळे) ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहाण भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे, त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!