Share

शेतकऱ्यांचा दिवाळी साजरा करण्याचा मानस होता पण होत्याचे असे नव्हते झाले   

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : कळमेश्‍वर तालुक्यात खरीप हंगामामध्ये शेतकरी कपाशी व सोयाबीन पिकाला प्राधान्य देतात. मृग नक्षत्रात सोयाबीन पिकाला प्राधान्य देतात. शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रात सोयाबीनची पेरणी केली. सुरवातीच्या काळात पावसाची योग्य साथ मिळाल्यामुळे पिके डोलू लागली.  ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादरुभाव झाल्यामुळे पीक पिवळे पडून खराब झाले. कृषी विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणामध्ये कळमेश्‍वर तालुक्यात २२00 हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात तालुक्यातील सोयाबीनचे पीक जोमात होते. परंतु कलधारणा व शेंगा पक्क होण्याच्या काळा त संततधार पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादरुभाव होऊन पिक पिवळे पडून खराब झाले.

चालू खरीप हंगामामध्ये तालुक्यात २१३२७ हेक्टर कपाशीची लागवड करण्यात करण्यात आली तर ३२00 हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली.  कृषी विभाग महसूल विभाग पंचायत समिती यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाअंती तालुक्यामध्ये २२00 हेक्टर सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.

सोयाबीन पाक नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी नागपूर यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी जगदीश नेरलवार यांनी दिली.कमी काळाचे व नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांनी उसनवारी तसेच सावकाराकडू कर्ज घेऊन शेतात सोयाबीनची पेरणी केली.

होणार्‍या उत्पादनातून कर्जाची परतफेड कुटुंबाचा उदरनिर्वाहासह दिवाळी सण साजरा करण्याचा मानस होता. परंतु अतवृष्टीमुळे सोयाबीन पीक खराब झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेले नुकसान पाहता शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!