Share

रुग्णालयातील बेड्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘याच’ अधिकाऱ्यांची, पालकमंत्र्यांचे स्पष्ट

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : सामान्य माणसाला कोरोना आजारावर मात करताना रुग्णालयातून उत्तम सेवा मिळणे अपेक्षित आहे. त्याला बेड उपलब्ध नाही असे म्हणणे योग्य निश्चितच राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला बेड मिळेल आणि उत्तम आरोग्य सेवा मिळेल या व्यवस्थापनाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

यासाठी मेयोमध्ये मीताली सेठी आणि मेडिकलमध्ये भाग्यश्री सातपुते या आयएएस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी बेडच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देतील, तसेच वैद्यकीय उपचार व अन्य बाबींकडे संबंधित रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी लक्ष घालावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

पालकमंत्र्यांनी दोन्ही सनदी अधिकार्‍यांचे व्यवस्थापनाबद्दलचे अभिप्राय जाणून घेतले. मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी दोन सविस्तर बैठकी घेतल्या. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे त्यांच्यासह अधिनस्त अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी काही उपाययोजना सूचवल्या.

यामध्ये अमरावती, अकोला, चंद्रपूर व अन्य ठिकाणांवरून येणार्‍या बाधितांची संख्या वाढत असून येणार्‍या काळात नियोजन करताना या बाबींकडे लक्ष देण्याचे देखील सांगितले. कंत्राटी पद्धतीने काही मनुष्यबळ उपलब्ध केले जात असून त्यासाठी युध्दस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी दिलेल्या सूचनांचेदेखील पालन करण्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बेडच्या उपलब्धतेसंदर्भात डिजिटल डिस्प्ले तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिले. अतिदक्षता कक्षातील बेडची संख्या वाढविण्यात यावी. पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात यावी. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर बाधितांच्या नातेवाईकांना रुग्णांना पाहण्याची सोय करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या सर्व संस्थांना आवश्यक निर्देश द्यावे. तसेच अन्य राज्यातून ऑक्सिजन आयात करण्यासाठी यापुढे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मिलिंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पालकमंत्री आज नागपूर येथे येत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत खासगी वैद्यकीय प्रॅक्टिशनर, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार लोकप्रतिनिधी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्या बोलणार आहेत. खासगी हॉस्पिटललादेखील उपचार करताना अत्यावश्यक औषधांची कमतरता पडणार नाही. या संदर्भातील उत्तम समन्वय प्रशासन व खासगी हॉस्पिटल- यंत्रणा यांच्यामध्ये ठेवण्याचे निर्देशही त्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!