चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्यासंख्येने तपासण्या गरजेच्या आहेत. प्रामुख्याने आपल्या उदनिर्वाहासाठी दुसऱ्याकडे धुनी-भांडी, स्वयंपाक आदी घरकाम करणाऱ्या महिला व पुरुष तसेच जे हॉटेल, उपहारगृह, कॅटरर्स, अलगीकरण केंद्र, कोविड रुग्णालयामध्ये भोजन पुरवितात, त्यांच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोवीड तपासणी घरमालकांनी, व्यावसायिकांनी करावी असे आदेश काढावेत,अशी मागणी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे.
तपासणीत काही समस्या आल्यास त्यांना पगारी सुट्टी देण्यात यावी व वेतन देण्यासाठी घरमालकांना तसेच व्यावसायिकांना सूचित करण्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. कोवीडच्या भितीपोटी अनेक घरगुती काम करणाऱ्यांना नौकरदारांना नौकरीतून मुक्त केले जात आहे, ही फार मोठी समस्या समोर येत आहे.
दुर्दैवाने स्वतःच्या सुरक्षेकरिता घरमालक हे पाऊल घेत असेल, तरीपण अशा कामगारांना काही काळ कामावर येणे थांबविणे, घरकाम करणाऱ्यांना वेतन देणे बंद करणे, चुकीचे आहे. त्यामुळे अशांना वेतन देण्याकरिता सक्तीचे आदेश काढण्याचे व वेतनाचे प्रमाण कमी जास्त करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी ठरवावे, असेही अहीर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- मातोश्रीवर धमकीचे फोन करणारा अटकेत
- एका चित्रपटाने कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…
- सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने छगन भुजबळ होम क्वारंटाईन
- वर्धा वासियांनी अनुभवली अवघ्या 15 वर्षांच्या निकेतनची अनोखी सफारी
- नव्या दमाच्या हाय कमांडच्या दृष्टिकोनातून उपयोगिता मूल्य संपल्याने “सुशील पर्व” अस्त होण्याच्या मार्गावर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

