मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.या शिवसैनिकांना जामीन मिळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे.
कमलेश चंद्रकांत कदम, संजय शांताराम मांजरे, राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, सुनील विष्णू देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांच्या डोळ्याला देखील दुखापत झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली होती.
यानंतर आता भाजप या मुद्द्यावरून आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांवर योग्य गुन्हे दाखल न केल्याने त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता मोकाट फिरत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावला. तर, आरोपींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यानंतर पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया-
“निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली. शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलं.त्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं, पण लगेच सोडून दिलं.”
“पोलिसांनी जी कलमं लावणं अपेक्षित होतं, ती लावली नाही. ती लावावी यासाठी आम्ही आज आंदोलन केलं. पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन केलं. पोलिसांनी कलमं वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. जर ही कलमं लावली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु”, असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या:-
- घरकाम करणाऱ्यांची अन वेटरची टेस्ट मालकांनी करावी, आदेश काढण्याची माजी केंद्रीय मंत्र्यांची मागणी
- निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन!
- मातोश्रीवर धमकीचे फोन करणारा अटकेत
- एका चित्रपटाने कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…
- सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने छगन भुजबळ होम क्वारंटाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

