मुंबई: सामना अग्रलेखात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि इतर नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. अग्रलेखातील टिकेनंतर भाजप नेत्यांच्या रडारवर खा संजय राऊत हे आले आहेत. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे ‘नेमेचि येतो पावसाळा’ असल्याचं दरेकर यांनी म्हंटल आहे.
…तर माझं आणि अजित पवारांचं सरकार १०० टक्के टिकलं असत – देवेंद्र फडणवीस
संजय राऊत एका दिवशी एका व्यक्तीची स्तुती करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच टीका करतात. टीका आणि स्तुती केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रचनात्मक काम केले आहे. संजय राऊत यांनी कोणतीही संस्था उभी केलेली नाही की रचनात्मक काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना विखे पाटलांच्या विरोधात टीका करण्याचा अधिकार नाही, असं म्हणत दरेकर यांनी टीका केली आहे.
महाजनांच्या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला, गुन्हा झाला दाखल
‘विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहोत याचे प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात. विखे महाशयांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य केले, की “एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत”. यावर शांत बसतील ते थोरात कसले. थोरातांनीही सांगितले की “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे” असा टोला ‘सामना’तून लगावला होता.
देवेंद्र फडणवीस यांची दवाखान्याला भेट, फिजिकल डिस्टन्सचे वाजले तीन तेरा !
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील खुले पत्र लिहित संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘थोरातांची कुरकुर नाहीच ! विखेंची टुरटुर !’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. अस विखेंनी संजय राऊत यांना सुनावलं आहे. तर नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही. असा घणाघाती टोला देखील राधाकृष्ण विखेंनी राऊतांना लगावला आहे.


