Share

…तर माझं आणि अजित पवारांचं सरकार १०० टक्के टिकलं असत – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी आली होती की, राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होते, असा खळबळजनक खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

मोठी बातमी : चीन्यांचे दात घातले घशात पूर्व लडाख मधून सैन्य मागे हटणार

अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता, तर ते सरकार टिकलं असतं. 100 टक्के टिकलं असतं. ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. आणि त्यामुळे त्यात आम्ही फारसं काही करु शकलो नाही. म्हणून मी आज जेव्हा मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं हा निर्णय चुकला होता. अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काही पत्रकारांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. मात्र यात खरं काय आहे याबाबत संपूर्ण घटनेचा खुलासा मी करणार आहे. मी ज्यावेळी पुस्तक लिहील, त्यावेळी मी त्यात या गोष्टीचा खुलासा करेल. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. पण आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. ‘राष्ट्रवादी’ म्हणजे ‘अजित पवार’ नाही. मी त्या सर्व चर्चेत होतो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत झालो. तीन चार दिवस आम्ही कुठलीही हालचाल केली नाही. पण नंतर आम्हाला अजित पवार यांच्याकडून फिगर आली. त्यांनी सांगितलं की, तीन पक्षांचं हे सरकार चालू शकत नाही. म्हणून सकाळी तो शपथविधी झाला. तो निर्णय चुकीचा झाला. आज तो निर्णय चुकीचा झाला असं वाटतंय. अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही – दादा भुसे

मात्र त्यावेळी ते बरोबर वाटलेलं. ज्यावेळी तुमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसत असेल, त्यावेळी तुम्हाला जगावं लागतं. म्हणून रात्री ठरलं आणि सकाळी शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकलं असतं, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अजित पवार यांच्याबरोबरच्या सरकारचे शिल्पकार अमित शाह होते, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!