Share

महाजनांच्या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला, गुन्हा झाला दाखल

Published On: 

🕒 1 min read

जळगाव – पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान, दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित असल्याचे राज्यात चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘शासनाच्या नावे कर्ज मांडावे,’ असे बँकांना सांगितले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली असल्याचे समोर येत आहे. दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्याच्या प्रोत्साहन अनुदानाचा आदेश देखील निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप आमदार गिरीश महाजन मंगळवारी रस्त्यावर उतरले. जामनेरमधील भाजपाच्या या शेतकरी आंदोलनात मात्र सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. News18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाजन यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यामध्ये 100 ते 125 कार्यकर्त्यांच्या उपस्थित होतं. नगरपालिकेसमोरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.

आता कसं होणार ! विधान परिषदेत कॉंग्रेसची 2 जागांसाठी मागणी, महाविकास आघाडीत नवा पेच

पक्षविरोधी कारवाई केल्याने राष्ट्रवादीने धाडली ‘त्या’ आमदाराला नोटीस

शेतात विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने गैरसोय, बळीराजावर आंदोलनाची वेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!