पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. दरम्यान, नेते, पदाधिकाऱ्यांनी तुफान गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र यावेळी पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.
एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही – दादा भुसे
देवेंद्र फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आगमन झाले. त्यांनी शहरातील करोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे केल्याने फिजिकल डिस्टनचा मात्र फज्जा उडाला.
‘जागतिक नेत्यांच्या’ वैयक्तिक मैत्रीचा देशाला फायदा नाही, रोहित पवारांचा मोदींवर घणाघात
पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोना रुग्णासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे याठिकाणी फक्त कोरोना रुग्णांना प्रवेश दिला जातो. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषयीची माहिती घेण्यासाठी फडणवीस हे आले होते. दुपारी साडेबाराची वेळ असल्याने भाजपचे कार्यकर्ते दुपारी बारापासून हॉस्पिटलमध्ये गर्दी करून होते. फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास आगमन झाले होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स इन चे तीन तीन तेरा वाजले होते.

