Share

लातुर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरु आहेत. तीन पक्षाच्या जोरावर महाविकास आघाडीने काही ठिकाणी आपली सत्ता काबीज केली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी भाजपने बंडखोरांच्या मदतीने सत्ता मिळवली आहे.

एकीकडे विधानसभा निवडणुकीत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात दणदणीत विजय मिळवत काँग्रेसच्या अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी सत्ता स्थापन केली. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना काही कमाल करता आली नाही.त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल केंद्रे तर उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, रावसाहेब दानवेंच्या जालना जिल्हा परिषदेत भाजप सपशेल अपयशी ठरली आहे. जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा विजय मिळवला आहे. जालना जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महेंद्र पवार यांची निवड झाली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि जालन्यातील भाजपचे ताकदवार नेते रावसाहेब दानवे यांना हा धक्का बसला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!