टीम महाराष्ट्र देशा : तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जानेवारीतील 97 पूजांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे.
तुळजाभवानी मंदिर समितीने सिंहासन पूजेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे. तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव 3 जानेवारीपासून सुरू झाला असून, तो 10 जानेवारीपर्यंत चालेल. या काळात तिन्ही स्थानिक पुजारी मंडळांच्या सदस्यांच्या सिंहासन पूजा असतात. त्यामुळे भाविकांसाठी सिंहासनाची नोंदणी 11 ते 31 जानेवारी या कालावधीसाठी सुरू झाली आहे.
सिंहासन पूजेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी मंदिर समितीने नियमावली ठरवली आहे. भाविकांनी सिंहासन पूजा करताना पर्याय निवडावा, पूजेची तारीख निश्चित करावी, सिंहासन पत्ता, शहर, पिनकोड, राज्य, देश, दूरध्वनी क्रमांक, नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा बॅंकेला जोडलेला मोबाईल क्रमांक, शक्यता असल्यास पुजाऱ्याचे नाव, पूजेसाठी येणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि ओळखपत्र आवश्यक आहे. सिंहासन पूजेकरिता सर्व नोंदणीकृत सदस्यांनी फोटोच्या पुराव्यासह येणे आवश्यक केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

