🕒 1 min read
वेबटीम : ‘लेकीला आज्ञा द्या बाबा, दसरा तुमचा विचारही तुमचेच, आम्हीही तुमचे, स्थळ मात्र आता तुमची पावन जन्मभूमी… सावरगाव येथे येत आहे सीमोल्लंघन करण्यासाठी दसरा मेळाव्यासाठी’ अशी भावनिक साद घालत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगावकडे प्रस्थान केले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांची ‘माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनिटे द्या’ ही विनंती फेटाळली.
दसऱ्याच्या शुभेच्छा लेकीला आज्ञा दया बाबा, निघाले सावरगाव ला सीमोल्लंघन सर्वार्थाने करून,विचार तुमचेच दसरा तुमचाच आता स्थळ जन्मभूमी सावरगाव pic.twitter.com/t3iSYAmpQ1
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 30, 2017
त्यानंतर वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या परंपरा मोडत पंकजा मुंडे यांनी भगवान बाबाचे जन्मस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला. अखेर आज दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या या भाषणाकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
