टीम महाराष्ट्र देशा : महाविकासआघाडीचे सरकार येताचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीय कृत बँकातून व्हावेत या दृष्टीने पाऊलं उचलायला सुरवात केली आहे. एक्सिस बँकेत असलेली पोलिसांची खाती ही राष्ट्रीय कृत बँकेत वळवण्यात येणार आहेत. तसेच आता महापालिका कर्मचाऱ्यांची बँक खाती अन्य दुसऱ्या बँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निर्णयानंतर आता मुंबई महापालिकेने हा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे.
सरकारच्या या निर्णयाला खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी सहमती दर्शवली आहे. राष्ट्रीयीकृत बँका सुरक्षित असल्याने आम्ही त्याबद्दल विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासगी बँका डुबल्यावर कोणी खातेदारांच्या पैशाची जबाबदारी घेत नाही, त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जायला हवे, तसा प्रस्ताव आला तर माझे समर्थन राहिल. सध्या केवळ अँक्सिस बँक दिसतेय, बाकी बँकांकडे लक्ष वळवले जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार आता दुसऱ्या बँकेत होणार, याला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या हजारो रुपयांच्या ठेवी तसेच अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची वेतन खातीही अॅक्सिस बँकेतून काढून राष्ट्रीयीकृत बँकेत नेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

