Share

भाजप सरकार देशात धार्मिक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत : शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देश हिंसाचाराने धुमसत आहे. देशभर हिंसाचार पसरला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांच्या या निर्णयाचा मात्र चांगलाच फटका बसला आहे. झारखंड निवडणुकांचा निकाल आज लागला ज्यात भाजपला केवल 28 जागांवर समाधान मानावे लागले. तर कॉंग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ”भाजप सरकार देशात धार्मिक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील गंभीर प्रश्न बाजूला करुन निवडणूक लढवल्यानंतर असेच चित्र पाहायला मिळणार याबद्दल मनात कोणतीही शंका नव्हती, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, NRC बाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे गोंधळात टाकणार आहे. कारण भाषणात मोदी NRC बाबत कोणतीची हालचाल सुरु नसल्याचं बोलत आहेत. तर दुसरीकडे संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा NRC हे विधेयक आणणार असल्याचं बोलत आहेत. त्यामुळे या दोघांचीही विधान संभ्रमात टाकणारी आहेत, असेही पवार म्हणाले. तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या ( CAA) विरोधात जनतेने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

जनतेने भाजपला नाकारलं आहे. त्यामुळे झारखंडच्या जनतेचे कौतुक करतो. इतर राज्यातही संधी मिळाल्यावर जनता भाजपला धडा शिकवेल. आता प्रत्येक राज्यात झारखंड सारखी परिस्थिती दिसेल. 5 व्या राज्यात मोदी सरकारला जनतेने दुर ठेवले आहे. जनता भाजपला नाकारत आहे. तसेच NRC आणि CAA आणून सरकार स्वतःचं अपयश झाकण्यासाठीचं समाजात धार्मिक अंतर वाढण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1209080904766779394?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209077565962346497?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!