🕒 1 min read
पुणे : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव होण्यास पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे हे पदाधिकारी तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे करण्यात आली होती अशी चर्चा आहे . सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे आमदार झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी करण्यात आला. महापौरपदी मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने, तर सभागृह नेतेपदी धिरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. हे पदाधिकारी बदलताना भाजपचे पुणे शहर चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर, 3 मतदारसंघात विजय मिळविता मिळविता नाकीनऊ आले होते. खडकवासला मतदारसंघात तर भिमराव तापकीर यांचा केवळ 2600 मतांनी विजय झाला.यानंतर झालेल्या पुणे महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते बदलताना गणेश बिडकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे या निवडी होत असताना बिडकर स्वतः जातीने उपस्थित होते. अगामी काळात त्यांचा महापालिका कारभारात सहभाग वाढणार असल्याची कुजबुज आहे. आगामी महापालिका निवडणुकित या पाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. बिडकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे मानले जातात.
बिडकर यांचा 2017 च्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ते महापालिका कामकाजापासून अलिप्त राहिले होते. त्यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिडकर यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206477876544958466?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206473433275486208?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
