Share

CAB आणि NRCबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मुद्द देशात चांगलाचं पेटला आहे. ईशान्य भारतात सुरु झालेल्या हिंसक आंदोलनाचे लोण आता उत्तर भारतातही पसरू लागले आहेत. त्यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली असून नागरिकांनी या कायदाचा तीव्र निषेध केला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांनीही भाष्य केले आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा (CAB) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे ( NRC) उत्तर आणि दक्षिण भारतात मोठा संघर्ष निर्माण होईल. आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला होता. संसदेत त्याबद्दलची भूमिकाही मांडली. आता त्यावरूनच देशात आग लागेल आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होईल, असे पवार म्हणाले.

दरम्यान आसाममध्ये अद्यापही तणाव असून, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. पोलिसांच्या गोळीबारातील दोन जखमींचा मृत्यू झाल्याने आंदोलनात जीव गमावलेल्यांची राज्यातील संख्या चार झाली आहे. राज्यातील मालदा, मुर्शिदाबाद, हावडा, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा या पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1206453769422008320?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206450483860135942?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206444082081353728?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!