Share

पंकजा मुंडे राहिल्या बाजूला ? ‘या’ नेत्यानेचं केला विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातली सत्तेची संधी हुकल्यानंतर भाजपने विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. विरोधी नेते पदासाठी भाजपकडून सुरेश धस, पंकजा मुंडे, आणि विनायक मेटे यांची नावं चर्चेत आहेत. यावरून शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार असल्याचा दावा केला आहे.

ते म्हणाले की, भाजपमधील घटकपक्ष आणि भाजपा आमदार यात सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर सुद्धा माझाच अधिकार आहे. मात्र असं असलं तरीही विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचा याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीचं घेतील, असे मेटे म्हणाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतं मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. तर भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.मात्र भाजप पक्ष पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देणार असल्याचीही चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1204009371425857537?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204006432275697664?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204002798540427264?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!