Share

हिंगोलीतील समृद्ध गाव स्पर्धेमध्ये ९ गावे सन्मानाला ठरली पात्र

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामधील ९ गावे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणाऱ्या सन्मानाला पात्र ठरली आहेत. या गावातील ग्रामस्थांचा सत्कार करुन सन्मान देखील करण्यात येणार आहे.

कळमनुरी तालुक्यातील रामवाडी, सालेगाव, शिवनी खुर्द, जरोडा, नवखा, मसोड, नांदापूर, बोल्डावाडी,  वारंगातर्फे नांदापूर, या गांवाचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या मध्ये बचतगटाच्या स्थापनेचा उद्देश पुर्ण करणे, जुन्या रचनांचे सर्वेक्षण, विहिर मोजमाप पुर्ण करणे,  पर्जंन्यमापक बसवणे, गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, कुरणाचे क्षेत्र राखीव ठेवणे, वृक्ष संर्वधनाचे उद्दीष्टे पुर्ण करणे, विहिर, बोअर तसेच हंगामानुसार पिकांचा सर्वे पुर्ण करणे, जलबचतीचे बारमाही उद्दीष्ट पुर्ण करणे इत्यादी कामे ९ गावांनी पुर्ण केलेली आहेत. या मध्ये गावांना १२० पैकी ७० च्या वर गुण मिळवले आहेत. त्यामुळे लवकरच या ९ गावांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.

या ९ गावांमध्ये वरील कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. तसेच गावांमध्ये अनेक ग्रामीण विकासासह शेती, पाणी, सिंचनाचे पाणी बाबत देखील कामे करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील अनेक समस्यांचे निराकरण या माध्यमातून होणार आहे. तसेच या माध्यमातून गावांचा सर्वांगिन विकास देखील होणार असल्याने झालेले सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून शेती, सिंचन, रोजगार देखील या माध्यमातून मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!