Share

८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्समधून डिस्चार्ज

Published On: 

दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

दरम्यान, देशातील अनेक बड्या नेत्यांसह लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाचा विळखा बसत आहे. १९ एप्रिल रोजी भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, आता त्यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर येत आहे.

८८ वर्षीय मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज (गुरुवारी) एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महत्वाच्या सूचना केल्या होत्या. यावरून काही नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!