Share

वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर ७२ तासांची बंदी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भोपाळ लोकसभेच्या भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने ७२ तास म्हणजेच ३ दिवसांची बंदी घातली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई केली आहे.

या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होते की, “मी बाबरी मशिदीवर फक्त चढले नव्हती, तर ती पाडण्यासाठी मदतही केली होती, यावर मला खूप गर्व आहे, मला देवाने शक्ती दिली आहे, आम्ही देशाचे कलंक मिटवले”, असं वक्तव्य केले होते. यावर निवडणूक आयोगाने ठाकूर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, “मी निवडणूक आयोगाचा सन्मान करते. पण मी शांत राहिले, तर इतर लोक माझ्यावर टीका करतील”, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!