पुणे : पुण्यातील बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये या दुर्घटनेत 6 ते 8 लोक जखमी असून आणखी काही कामगार जखमी असण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच एकूण ६ गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या.
जखमी कामगारांना वाकड येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. या बिल्डिंगचा रात्री स्लॅब काम सुरु होतं, त्यावेळी अचानक स्लॅब कोसळला. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.
पुणे पालिकेनं ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान स्लॅबखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत होते. परंतु स्लॅबखाली आणखी कोणीही अडकले नसल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अचानक स्लॅब कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात असून यावेळी एकूण १२ कामगार येथे काम करत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांना तुरूंगात ठेवून पब्लिसिटी करून घेणं हा वानखेडेचा उद्योग’- नवाब मलिक
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

