Share

‘या’ पदासाठी ५ ते १५ लाखांची दलाली सुरू; फडणवीसांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेच्या गोंधळामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी रात्री माहिती दिली. मात्र आता या सहा हजारांहून अधिक पदांसाठी दलाली सुरु झाल्याचा गंभीर आरोप राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की,’ठाकरे सरकारचं चाललंय काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. वारंवार परिक्षा रद्द होतेय. आता या परीक्षेसंदर्भात स्वत: मंत्रीमोहोदयांनी फेसबुक लाइव्हच्या माध्मयातून सांगितलं की कुठल्याही पद्धतीने परीक्षा रद्द होणार नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. त्यामुळे विद्यार्थी निघाले, पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आदल्या रात्री त्यांना समजतंय की परीक्षा रद्द झाली.’

तसेच पुढे ते म्हणाले की, ‘मला तर अशाही तक्रारी मिळाल्यात की काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत. या पदांसाठी पाच लाख १० लाख असे पैसे गोळा करण्यासाठी काही दलाल काम करत आहेत. मला वाटतं की हे फार गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. अशाप्रकारे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं चाललंय ते बंद झालं पाहिजे. नाहीतर आम्ही याच्याविरोधात आम्ही आंदोलन करु’ असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, ‘या पदांसाठी होणाऱ्या दलालीची चौकशी झाली पाहिजे. १०० टक्के या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात दलाली होत असून हे दलाल नक्की आहेत कोण हे समोर आलं पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्यात, अनेक विद्यार्थ्यांचे त्यासंदर्भात फोन आले की पाच लाख १० लाख १५ लाख रुपये मागीतले जात आहे. तर हे लोक नेमके आहेत कोण याची चौकशी केली पाहिजे’, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!