Share

रेल्वे बैठकीला ५ खासदारांची पाठ; मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत उदासिनता!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात नेहमीप्रमाणे अन्याय होत असल्याने मराठवाड्यातील रेल्वेचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कोकण रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करण्यात यावे. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील वर्षानुवर्षाच्या मागण्या प्रलंबित राहतात कशा? असा प्रश्न औरंगाबादचे खा.इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला. पाच खासदारांनी या बैठकीस अनुपस्थिती दर्शवल्याने रेल्वे प्रश्नांबाबत अजूनही उदासीनता असल्याचे दिसून आले.

मराठवाड्यातील खासदारांची बुधवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. इम्तियाज जलील, खा. संजय जाधव, खा. फौजिया खानसह आदींची उपस्थिती होती. यावेळी विविध प्रकल्पे, कामे करण्यासाठी व मराठवाड्यात रेल्वे विकासाकरिता निधी उपलब्ध होण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागातुन मराठवाड्यास सेंट्रल रेल्वेसोबत जोडण्यात यावे. तसेच शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचे एका महिन्यात काम सुरु झाले नाही तर रेलरोको जनआंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा देण्यात आला.

याशिवाय औरंगाबाद येथे पीटलाईन करण्यात यावी, अनेक वर्षापासुनची प्रलंबित मागणी असुन औरंगाबाद येथेच पीटलाईन व्हावी जालना किंवा इतरत्र ठिकाणी हलविण्यात येऊ नये. फायदा होत नाही म्हणुन मराठवाड्याचे प्रकल्प व कामे रद्द करण्यात येत असुन सहानुभुतीपुर्वक विचार करुन तत्काळ कामास सुरुवात करावी, नाही तर मराठवाड्याचा कधीच विकास होणार नाही. रोटेगाव-कोपरगांव २२ किमी रेल्वे रुळाचे काम २०१७-१८ साली मंजुर असुन आजपर्यंत त्याचा सर्व्हेच होत नसल्याने त्यास तात्काळ पुर्ण करण्यात यावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. ट

रेल्वेच्या बैठकीत पाच खासदारांची पाठ

औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच खासदारांची बैठक झाली. त्यातही पाच खासदारांनी पाठ फिरवली असल्याने उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले. नांदेडला जेव्हा बैठक घेतली जाते तेव्हा सर्व खासदार न चुकता उपस्थित राहतात. मात्र नांदेड वरून बैठक पहिल्यांदा औरंगाबादला बैठक घेतली आणि मराठवाड्याच्या पाच खासदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नाबाबत उदासीनता आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. रेल्वे प्रश्न सुटतील का? असाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!