Share

वसमत येथे ५ लाखांच्या तांब्याच्या तारा आणि ऑइल लंपास

Published On: 

हिंगोली: जिल्ह्यातील वासमत येथील परभणी रोडवरील जयनगरला लागून असलेल्या कृषी व पणन मंडळाच्या केळी निर्यात सुविधा केंद्रातील विद्युत डीपी फोडून चोरांनी चोरी केली असल्याचे समोर आले आहे. केंद्रातील विद्युत डीपी फोडून तांब्याची तार व ऑइल असे मिळून एकूण सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची माहिती समोर आली आली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात मंगळवार रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वासमत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी रोडवर जयनगरला लागून व गणेशपूर रोडवर कृषी व पणन मंडळाचे केळी निर्यात सुविधा केंद्र आहे. या केळी निर्यात सुविधा केंद्रामध्ये शुक्रवारी दि. २२ जून रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा भिंतीवरुन आतमध्ये प्रवेश मिळवला. यावेळी चोरट्यांनी आतमध्ये असलेल्या कृषी मालास लक्ष न करता त्यांनी बाजूलाच तार कंपाउंडमध्ये असलेल्या विद्युत डीपीकडे आपला मोर्चा वळवला. सदरील चोरट्यांनी तार कंपाउंड तोडले व डीपी फोडून त्यातील किमती असलेली तांब्याची तार व ऑइल घेऊन पोबारा केला.

चोरी घडली त्या दिवशी रात्रीचे विद्युत भारनियमन सुरु होते. याच भारनियमणाचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरी करण्यात आलेल्या सामानाची किंमत पाच लाख २३ हजार ३९६ रुपये एवढी आहे. चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर प्रल्हाद बोरगड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गरमे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!