मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले.अभिनेता सोनू सूद सध्या अनेकांसाठी देवमाणूस बनला. या कोरोना काळात आर्थिक मदतीपासून ते ऑक्सिजन, बेडपर्यंत सर्व प्रकारची मदत सोनू सूद करत आहे.
मात्र, मदत करणारा अभिनेता सोनू सूदकडे नेटकरी कोणतीही मागणी करतात दिसतात. नुसतंच एका तरुणीनं सोनू कडे बॉयफ्रेंड शोधून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमीनं देखील सोनू सूदकडे अजब मागणी केली आहे. याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. याच दरम्यान एका क्रिकेटप्रेमीनं सोनू सूदकडे एक मागणी केली आहे.
हमारी टीम में ऐसे दिग्गज हैं जो खुद ही भेज देंगे।
देखा, गया ना।???????? https://t.co/QLZ9aBy7rT— sonu sood (@SonuSood) June 22, 2021
क्रिकेटप्रेमीनं म्हटलं की सोनू सोदू प्लीज केन विल्यमसनला तंबुत पाठव ना! अशी मागणी केली आहे. जी मागणी केली ती वाचून एक क्षण तुम्हालाही हसावं की रडावं असं वाटेल. मात्र सोनूनं या क्रिकेटप्रेमीलाही खूपच भारी उत्तर दिल आहे. सोनूनं रिप्लाय देत म्हणाला की, टीम इंडियात असा एक खेळाडू आधीच आहे. पाहिलं का जो विल्यमसनला तंबुत पाठवेलं.
महत्वाच्या बातम्या
- वेतनासाठी सीपीएम प्रणाली लागू केल्याबद्दल शिक्षकांनी मानले सीईओंसह सभापतींचे आभार
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा


