Share

कोरोना लसीवर 5% GST; ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’ – सीतारामन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे GST परिषदेच्या 44 व्या बैठकीचे अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी यापुढेही कायम राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिसुचना उद्या जारी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जीएसटीचं आज जारी करण्यात आलेले दर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच कोरोना रुग्णावर उपचारासाठी महत्वाचं ठरत असलेल्या रेमडेसिवीरवरील जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटी आता ५ टक्के इतका करण्यात आला आहे. याआधी रेमडेसिवीरवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण आता वाढू लागले आहे. तसेच काळ्या बुरशीच्या औषधाअभावी रुग्णांची अडचणही वाढत आहे. देशात बुरशीचे प्रकार सतत वाढत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे रोग नियंत्रण व प्रतिबंध यासाठी अमेरिकेच्या केंद्रांच्या आकडेवारीनुसार म्युकोर मायकोसिस किंवा काळ्या बुरशीचे मृत्यू दर 54 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!