Share

महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आला कि त्याला विरोध करायचा हेच शिवसेनेचे धोरण

Published On: 

मुंबई : कोकणात पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करण्यासाठी भविष्यात त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, असे मत याआधी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

राज ठाकरे यांचा नाणार प्रकल्पाबाबत असलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत नाणार प्रकल्पासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊनच आणि स्थानिकांना रोजगारसंधी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. पण, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला प्रारंभी विरोध करण्याचेच धोरण शिवसेनेचे कायम राहिलेले आहे. आता राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रपरिषदेत शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आता तीन पक्षांचा पाठिंबा असताना या प्रकल्पाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

‘महाराष्ट्राच्या हिताचं मला कळतं, हित म्हणजे फक्त पैसा नाही, पर्यावरणही महत्त्वाचं आहे, रिफायनरी नाणारला होणार नाही, पर्यायी जागा आहे, नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.’ राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!