Share

मुंबईत ४ मजली इमारत कोसळली, जखमींवर उपचार सुरु

Published On: 

मुंबई: येथे अंधेरी पश्चिममध्ये जुहू येथील अमर सोसायटीमध्ये ४ मजली इमारतीचे काम सुरु असताना ते बांधकाम समोरच्या ३ घरांवर कोसळले. या ढिगाऱ्याखाली ५ लोक अडकली होती. या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ तासांचे रेस्क्यू करत जखमींना ढिगाऱ्याखालून काढले.

या घटनेमुळे काही काळ या ठिकाणी गदारोळ झाला. मात्र अग्निशमन दलाने तत्काळ येऊन परिस्थिती नियंत्रणात केली. सध्या या जखमींना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या ठिकाणी इमारत कोसळल्याने घरांचा ढिगारा पडला आहे. मुंबई महानगरपालिका तसेच अग्निशमन दलाकडून हा ढिगारा काढण्याचे कार्य सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे काहीकाळ या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले होते. सदरील ठिकाणी अनधिकृत बांधकाम असलेली अनेक घरे आहेत. या घटनेमुळे रहिवास्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेचा अधिक तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!