मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला. भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला.
यादरम्यान भारतीय संघासाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या आठ भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूत इंग्लंड दौऱ्यावर निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांचा समावेश होता. इंग्लंड दौऱ्यातील शुभमन गील, वॉशिग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी भारतीय संघात पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांची निवड झाली आहे.
यापुर्वी इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात कोरोनाने शिरकाव केला होता. भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र काही दिवसापुर्वीच रिषभ पंतने कोरोनावर मात करुन भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्यासाठी प्रयत्न : अजित पवार
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’; राऊतांच्या पर्यटनाच्या टीकेला दरेकरांच प्रत्युत्तर

