🕒 1 min read
नवी दिल्ली: जून २०२० रोजी पूर्व लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक (Galwan Conflicts) झाली होती. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र चकमकीनंतर चीनने (China) त्यांच्या सैनिकांचे मृत्यू लपवल्याचं आता समोर आलं आहे. याप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी चीनने केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’ मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालं आहे. ‘गलवान डीकोडेड’ नावाने प्रकाशित झालेला हा अहवाल स्वतंत्र संशोधकांच्या समुहानं तयार केला आहे. या चकमकीदरम्यान चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) अनेक सैनिक गालवान नदीत वाहून गेल्याचं सांगण्यात आलं आहे.
रिपोर्टमध्ये चिनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या हवाल्यानं म्हटलं आहे की, त्या रात्री किमान ३८ चीनी सैनिक नदीत बुडाले. तर चीनने केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं होतं. त्या रात्री नेमकं काय घडलं, चकमक का झाली, असं अहवालात म्हटलं आहे. बीजिंगने याबाबत अनेक तथ्य लपवून ठेवले होते. मात्र चीनमधील डिजिटल बातम्या आणि व्हिडिओमधून वेगळी बाजू समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि त्यांचा वेताळ बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो- सचिन सावंत
-
“उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा”, वाईनविक्रीवरून बंडातात्या कराडकरांची टीका
-
‘पुष्पा’तील ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का, ऐकून व्हाल दिवाने
-
‘मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड’; अनिल देशमुखांचा जबाब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
