Share

औरंगाबादेत लस न घेणाऱ्या ३७ जणांकडून मनपाने वसूल केला ‘एवढा’ दंड

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील ज्या व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय(Astik kumar Pandey) यांच्या आदेशानुसार नागरिक मित्र पथकाकडून शहरात बुधवारी  लसीचा डोस न घेणाऱ्या ३७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पथकप्रमुख प्रमोद जाधव(Pramod Jadhav) यांनी सांगितले.

कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंट अधिक संसर्गजन्स असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे. त्यामुळेच आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना लसीचा एकही डोस न घेता रस्त्यांवर फिरणाºया , तसेच लसीचा दुसरा डोस चुकविणाऱ्या नागरिकांना दंड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ डिसेंबरपासून मनपा हद्दीत करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी घेतला आहे.

त्यानुसार बुधवारी नागरी मित्र पथकाकडून शहराच्या नऊ भागामध्ये नऊ पथकाने एकूण ३७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी ५०० रूपयांप्रमाणे या नागरिकांकडून एकूण १८५०० रूपये वसुल करण्यात आले. यासोबतच रस्त्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करत एकूण ६९०० रूपयांचा दंड वसुल केला. दिवसभरात दंडात्मक कारवाईतून पथकाने २५४०० रूपये वसुल केल्याचे जाधव यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!