पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली आहे. आज (दि. १५ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल ३३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ९१६ इतकी झाली आहे. शहरातील २१२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७१ हजार २०९ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या ३ हजार ०३३ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २२५ रुग्ण गंभीर तर ५१३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना स्थिती पूर्ण आटोक्यात येण्यासाठी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

