औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधत असताना शहरातील पोलीस चौक्यांची अवस्था जास्त प्रमाणत बंद असल्याचे निदर्शनास येताच शहरातील ३३ पोलीस चौक्या पुनरुज्जीवित करण्यात आल्या. त्यामुळे पोलीस ठाण्यात न जाता नागरिकांच्या तक्रारी पोलीस चौकीत घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार मांडण्यास अडचण होणार नसल्याचे पोलीस आय़ुक्त निखील गुप्ता यांनी बुधवारी कार्यक्रमात सांगितले.
शहरात अनेक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौक्यांची स्थिती चांगली नव्हती. अनेक पोलीस चौक्या बंद स्थिती मध्ये होत्या, अश्या ३३ पोलीस चौकींना पुनर्जीवित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रारी मांडण्यात अडचण होणार नाही. मात्र गंभीर स्वरुपाची तक्रार ही पोलीस ठाण्याकडेच वळती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळी ११ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पोलीस ठाण्यांतर्गत असलेली पोलीस चौकी उघडी राहणार आहे. त्यात पोलीस कर्मचारी हजर असणार आहे. बंद स्वरूपात पोलीस चौकी असल्यास तत्काळ आयुक्तांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. पोलीस चौकीमध्ये किमान १ कर्मचाऱ्याची उपस्थिती अनिवार्य असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

