मुंबई : काही दिवसांपूर्वी नागपूरचे रहिवाशी मोहनीश जबलपुरे यांनी माहितीच्या अधिकारातून केंद्रीय माहिती अधिकाऱ्याला एक प्रश्न केला होता. हिंदू खतरे में है असं सांगितलं जात आहे. त्याबद्दलची माहिती आणि पुरावे द्यावेत, अशी मागणी जबलपुरे यांनी केली होती. त्यावर माहिती अधिकाऱ्याने हे उत्तर दिलं आहे.
काल्पनिक प्रश्नांना उत्तर देणं हे आमचं काम नाही. तसेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही आमच्याकडे नाही, असं सांगतानाच त्यामुळे तुम्ही गृहखात्याकडे त्याची विचारणा करावी, अशा सूचनाही माहिती अधिकारी व्ही. एस. राणा यांनी जबलपुरे यांना केली आहे. दरम्यान आता ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना होती, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय माहिती अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हा खुलासा केला आहे. याच मुद्द्याला धरून आता कॉंग्रेसने भाजपला खडे बोला सुनावले आहेत.
‘हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात लिंचिंग झाले, हत्या झाल्या त्याबद्दल भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत.’ अशी मागणी आता कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
"हिंदू धर्म संकटात आहे" हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात लिंचिंग झाले, हत्या झाल्या त्याबद्दल भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत pic.twitter.com/OmZnRVHmvX
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- सोनु सूद घेणार मोठा निर्णय?; गुजराती व्यावसायिकांसोबत पार पडली महत्त्वाची बैठक
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार


