मुंबई : देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला होता अशा परिस्थितीत सोनुने अनेक लोकांची मदत केली. त्याने केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. त्याचे हेच काम पाहून त्याच्या चाहत्यांनी तसेच बॉलीवूड कलाकारांनी त्याला राजकरणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावर अभिनेता सोनू सूद प्रतिक्रिया देत राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे सांगितेले होते. परंतु आता पुन्हा एकदा सोनूच्या राजकरणात प्रवेश करण्याची चर्चा रंगू लागली आहे.
काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेत. मेंटर कार्यक्रमाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोनू सूदची निवड करण्यात आली असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते.
आपच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीतील कार्यालयात सोनूच्या सदस्यत्वाबाबत बैठक झाली. या बैठकीत गुजरातचे प्रसिद्ध व्यावसायिकही सहभागी झाले होते. 2022 मध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या सोनुचा राजकारणामध्ये प्रवेशबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. त्यामुळे आता सोनूच्या प्रत्येक निर्णयाकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

