पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील जोशी हॅास्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. हर्नियाच्या ऑपरेशन नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. यानंतर काल दुपारी त्यांचे निधन झाले.
आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. यावेळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून पक्षाने काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
शरद रणपिसे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना करताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे सदस्य, दोन वेळा विधानसभेचे सदस्य, तीन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. अनेक विषयांचा त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास होता. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात काँग्रेस पक्षाचा विचार जपला आणि तळागाळातील लोकांसाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण रणपिसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- टी -20 विश्वचषकापूर्वी भारतासाठी चिंताजनक बातमी; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू अजूनही अनफिट
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; भाजपा महिला मोर्चाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

