Share

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर तब्बल 3000 किलो अफगाणी ड्रग्ज जप्त; पोर्टची मालकी अदाणींकडे

Published On: 

अहमदाबाद : गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अंमली पदार्थाच्या तस्करीवरून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अशातच, ज्या राज्यात दारूबंदी आहे त्या गुजरातमध्येच तब्बल 3000 किलोचे ड्रग्ज सापडले आहेत. विशेष म्हणजे, हा ड्रग्ज साठा अफगाणी बनावटीचा असल्याचे काल समोर आले आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली आहे. डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सला (DRI) मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी गुजरातमधील कच्छ भागातील मुंद्रा या पोर्टवरुन 2,988 किलो अफगाणी हिरॉईन जप्त केलं. दोन कन्टेनरमधून भरुन आलेल्या या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंद्रा पोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सध्या गौतम अदानी समुह सांभाळत आहे. हा साठा सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावरून अदानी समूहावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी याबाबत अदानी समूहाने स्पष्टीकरण द्यावी अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!