Share

लग्नानिमित्त अख्ख्या शिऊर गावाला ३ महिन्याचे मोफत राशन वाटप !

Published On: 

निलंगा : तालुक्यातील शिऊर येथील विकास सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर बिरादार यांनी मुलाच्या लग्नानिमित्त अख्ख्या गावाला ३ महिन्याचे राशनचे धान्य मोफत वाटप करुन समाजासमोर एक आगळावेळा आदर्श घालून दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिनकर बिरादार यांचा मुलगा विष्णू याचा विवाह गणेशवाडी(ता.उदगीर) येथील नरसिंग डोंबाळे यांची कन्या मैना हिच्या सोबत २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. आपल्या मुलाचा विवाह सोहळा गावजेवण देवून मोठ्या थाटामाटात पार पाडण्याचा वरपित्याने बेत आखला होता. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॕकडाऊनमुळे लग्न समारंभात कसलाही बडेजाव न करता अत्यंत साध्या पध्दतीने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न पार पाडण्याचा निर्णय बिरादार परिवाराने घेतला आहे.त्याचबरोबर आपल्या मुलाच्या लग्न समारंभाच्या पार्श्वभूमीवर गावातील ३७० कुटूंब लाभार्थ्यांना माहे एप्रिल,मे व जून या ३ महिन्याच्या राशनचे गहू व तांदूळ हे धान्य मोफत वाटप करण्याचा निर्णय दिनकर बिरादार यांनी घेतला आहे.त्यानुसार एप्रिल या महिन्याचे राशन गावातील सर्व लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

धान्य वाटप करताना सामाजिक अंतर पाळण्यासाठी चक्क शामियाना उभा करुन व मास्क वापराचे पालन करुन धान्याचे वाटप करण्यात आले.ग्रामसेवक पी.एन.राचूरे,अमीर पटेल,अरुण अष्टूरे,ज्ञानदेव सुर्यवंशी,व्यंकट सावंत,हस्मुद्दीन सय्यद,राजकुमार सोमवंशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिरादार परिवाराने अत्यंत साध्या पध्दतीने लग्न पार पाडण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे तर मोफत राशनचे धान्य वाटप हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!