Share

दहावी आणि बारावीत पास होण्यासाठी आता ३५ नव्हे २५ टक्केच पुरेसे?

Published On: 

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने आता सतत महत्वाच्या बाबी समोर येत आहेत. नुकतेच राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव व्हावा यासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आता आणखी एक दिलासादायक बातमी विद्यार्थ्यासाठी असल्याचे समजले जात आहे.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा निकष आता ३५ ऐवजी २५ टक्के करण्याचा विचार करण्यात येत आहे. याबाबत राज्य परीक्षा नियोजन समितीकडून गांभीर्याने विचार होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कमी स्वरूपाचा अभ्यासक्रम असल्याने हा निर्णय घेतला अजण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे २०२० -२१ या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले. वर्गातून शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

खासगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने नेमण्यात आलेली समिती ग्राह्य धरणार आहे. पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!