🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काल काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.
शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. महाराष्ट्र सरकारने ही नियमावली जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बरेच जण या नियमावलीवरून आपले मत सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच बॉलीवूड अभिनेता जावेद जाफरीने या संदर्भात एक मजेदार ट्वीट शेअर केले आहे.
जावेदने ‘बॅण्ड्रा टाइम्स’ अशा मथळ्याखालील एका सूचना फलकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नव्या निर्बंधानुसार अंत्यसंस्काराकरता २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच दारुची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.
Only in Bandra ???? pic.twitter.com/buahy1RKWa
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) April 4, 2021
अंत्यविधीला केवळ 20 आणि दारूच्या दुकानासमोर 2000 जणांना परवानगी या निर्बंधामागील लॉजिक या फोटोद्वारे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा आशयाचे ट्विट जावेदने केले आहे. जावेद जाफरीच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या,मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
