नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलेल्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत आहे. भारतात दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता . मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे.
त्यानंतर, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
मात्र बुधवार पासून जरी देशातील विमानसेवा बंद करण्यात आली असली तरी देखील मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले. करोनाचा नव्या प्रकार रोखण्यासाठी या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामध्ये २० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती अजून समोर आलेली नाही.
त्यामुळे आता या रुग्णांच्या माध्यमातून नव्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी एम्सचे संचालक गुलेरिया यांनी “भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघण्याची गरज पडणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचं जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. त्याचबरोबर त्यांच्या हा विषाणू आढळून आला, तर त्यांचं विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये,” असं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकारचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा फक्त तोंड देखला आहे – आंबेडकर
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘अनेक नेत्यांना शिवसेनेत यायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करायचं आहे’
- ‘अजून २५ आमदार असते तर उद्धव ठाकरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते’
- युवकांच्या स्टार्ट-अपसाठी राज्य सरकारचा पुढाकार; तब्बल ‘इतक्या’ लाखांचं देणार अर्थसहाय्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

