Share

पहिल्यांदा नाहीतर दुसऱ्यांदा पंकजा मुंडेंनी फोडला राष्ट्रवादीचा उमदेवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा स्व. गोपीनाथ मुंडेंच्या समाधी समोर पार पडला.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवारी असतानाही नमिता मुंदडा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवारी फोडण्याची दुसरी वेळ

राष्ट्रवादीचा उमेदवार फोडण्याची भाजपची ही दुसरी वेळ आहे. याआधी विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुरेश धस यांच्या विरोधात लढलेल्या रमेश कराड यांना ऐनवेळी भाजपने आपल्या बाजूने केलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपच्या सुरेश धस यांच्या विरोधात रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र कराड यांनी अचानक माघार घेतल्याने राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांन पुरस्कृत केलं होतं. त्यावेळी सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्या अटीतटीच्या लढतीत धस यांनी बाजी मारली होती. त्यानंतर रमेश कराड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178643600936095744?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178646903715586049?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!