औरंगाबाद : मराठवाड्यासाठी संजीवणी ठरणाऱ्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत विसर्गाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला चार आणि नंतर १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीमधून टप्या-टप्याने विसर्ग वाढवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. नाशिकच्या गंगापूर आणि इतर धारणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरण्याच्या आधीच टप्या-टप्याने विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गेल्यावेळी ओढावलेली पूर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहील असा, प्रशासनाचा अंदाज आहे.
या संदर्भात नदीकाठच्या सर्व गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बीड, जालना, परभणी आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील याची पूर्वसूचना दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि पालकमंत्र्यांना याची माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १५ ऑक्टोंबर पर्यंत जायकवाडी धरण १०० टक्के भरलेले राहिल, त्याचे नियोजन करुनच पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यवतमाळमधील वाहून गेलेली बस सापडली; चालकासह एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

