Share

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्त भागांना केल्या जाणाऱ्या मदतीची त्यांनी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या या मदतीची किंमत अडीच कोटीच्या आसपास आहे.महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीच्या काही भागात घरांचे तसेच अन्य नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्य या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या सोबत आहे. हे जिल्हे सोडल्यास राज्याच्या उर्वरीत भागात अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले आहे.मात्र या सहा जिल्ह्यांमध्ये झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे तिथे तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार आपल्यापरीने मदत जाहीर करेलच. पूरपरिस्थितीचे पूर्ण चित्र राज्य सरकारसमोर आल्यानंतर अंतिम धोरण आखले जाईल.असे त्यांनी परिषदेत स्पष्ट केले आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजार घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार आहेत. यात घरगुती भांडी, पांघरुण साहित्य, खाण्याच्या वस्तू यांचा समावेश असेल.तसेच पुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करून २५० डॉक्टरांची पथके बाधित गावांमध्ये कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहेत. तसेच १ लाख कोरोना प्रतिबंधक मास्कचा पुरवठा ट्रस्टकडून केला जाणार आहे.जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते,कार्यकर्ते आपल्यापरिने मदत करतील. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांची २५० डॉक्टरांची टीम ही पूरग्रस्त भागातील गावात जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करणार आहे. सौम्य आजार असलेल्या लोकांना औषधे दिली जाणार आहेत. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाईल.

ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी बिस्किट आणि टोस्ट याचे वीस हजार किट्स ब्रिटानिया आणि इतर कंपन्याकडून एकत्र करून त्याचे वाटप केले जाणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!