Share

IPL 2022 GT vs RCB : बलाढ्य गुजरातसमोर बंगळुरुचं आव्हान; डु प्लेसिसनं जिंकला टॉस!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज शनिवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत, यापैकी पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (GT vs RCB) यांच्यात होईल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुजरात संघ आठपैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, बंगळुरूचा संघ नऊपैकी पाच सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा खेळ उत्कृष्ट राहिला आहे आणि संघाने अनेक वेळा अटीतटीच्या सामन्यांत विजय मिळवला आहे. या संघाची फलंदाजी कागदावर तितकी मजबूत दिसत नाही पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूने निर्णायक प्रसंगी योगदान दिले आहे. वृद्धिमान साहा अर्धशतकासह फॉर्ममध्ये परतला, ही संघासाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, शुबमन गिलची कामगिरी चांगली झालेली नाही. गुजरातचा संघ गोलंदाजीत खूपच मजबूत दिसत असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांसाठी ही बाब सोपी जाणार नाही.

आरसीबीला त्यांच्या मागील दोन्ही सामन्यांमध्ये पराभवल पाहायला लागला आहे आणि या दोन्ही सामन्यांमध्ये संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली होती. हैदराबादविरुद्ध आरसीबी संघ ६८ धावांत, तर राजस्थानविरुद्ध संघ ११५ धावांत आटोपला.

दोन्ही संघांची Playing 11

गुजरात टायटन्स – शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कप्तान), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!