Share

लातूरमध्ये जवळपास एक क्विंटल गांजा जप्त, १४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

लातूर: जिल्ह्यात कोरोना सोबतच गुन्हेगारी देखील चांगलीच वाढत आहे. तसेच अवैध धंदे देखील जोरात चालू असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून कारमधील प्लास्टिकच्या ४३ पिशव्यांमध्ये तब्बल ९५ किलो गांजासह १४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाला जप्त केला आहे. तसेच यामध्ये कार मधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खाडगाव ते ५ नंबर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस ठाणे एमआयडीसीमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. पथकाने खाडगाव ते ५ नंबर जाणारे रिंगरोडवर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम.एच. २४/ए.एफ./ २०९५) येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीत प्लास्टिकच्या ४३ पिशव्यांमध्ये तब्बल ९४.६ किलोग्राम इतक्या वजनाच्या हिरव्या रंगाचा बीमिश्रित गांजा आढळून आला.

गांजाची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव वैभव रानबा उजगरे, मनोज शेषराव जोगेश्वरी व प्रेमनाथ चंद्रकांत शिंदे असे सांगितले. तपासादरम्यान स्वत:च्या फायद्यासाठी प्रतिबंधित गांजाची वाहतूक करीत असल्याचे तिघांनी सांगितले. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. ३४६/२०२१ कलम २० (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वरील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व कार असा एकूण १४ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!