मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण १४ दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या काळात शाळांकडून सुरु असलेले ऑनलाईन शिक्षणही बंद राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मंत्री गायकवाड यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रचंड गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं. मात्र आता हळूहूळू अनेक शाळा सुरू झाल्यात. त्यात आता दिवाळी आल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीचे वेध लागले होते. याबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासनानं परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/KaAMvHDadk
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 27, 2021
शासनाच्या परिपत्रकात म्हटलंय की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामीण आणि शहरी शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन स्वरुपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सण-उत्सवाकरिता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला


