Share

पुणेकरांना दाखवलेले चोवीस तास पाण्याचे गाजर नेमकं पुर्ण करणार कोण ?

Published On: 

पुणे : गेल्या दोन वर्षापासुन पुण्यासह राज्यात पावसाची जोरदार हजेरी असली तरी पुण्याचा पाणीप्रश्नाने सध्या चांगलाच वेग घेतलाय पुण्यासह पिंपरी -चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असुन मुळशीचे पाणी दिले जावे. अशी आग्रही मागणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. त्याला टाटा ग्रुप किती प्रतिसाद देईल हे महत्वाचे आहे. पण सध्या पुणेकरांना 19 टीएमसी पाणी देत असल्याचे दावा करण्यात अजितदादा मात्र विसरले नाहीत.

पुणे जिल्हा परिषदेच्यातीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानतंर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्याचा पाणीप्रश्न हा नेहमीच चर्चैचा विषय राहिलाय .पुण्याला टेमघर, वरसगाव, खडकवासाला, पानशेत या धरणातुन तर पिंपरी-चिंचवडला पवना धरणातुन पाणीपुरवठा केला जातो. पण सध्या दोन्ही शहराची लोकसंख्या वाढत असुन आता टाटा ग्रुपने मुळशीचे पाणी दिले जावे अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केलीय. वीज निर्मितीचे इतर पर्याय उपलब्ध असुन पाण्याचाही वापर केला जातो पण उर्वरित पाणी हे पुणे-पिंपरी चिचंवड मधील नागरिकांना दिले जावे अशी मागणी अजित पवार यांनी केलीय.

तर दुसरीकडे पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या टेमघर धरणाची निर्मिती आघाडी सरकारच्या काळात झाली होती. पण नेहमीच राहणा-या गळती मुळे हे धरण भरले जात नाही गेल्या पाच वर्षापासुन टेमघर धरमाची दुरुस्ती केली जाते पण याबाबत अजित पवार यांनी आस्ते कदम राहत प्रतिक्रिया देत वेळ मारुन नेली. पण ठेकेदारावरील कारवाईचे ते काही बोलले नाहीत.

एकुणच काय पुणेकरांच्या पाण्याबद्दलचा कळवळा दाखवायाच पण दुसरी कडे ठोस कारवाई अथवा कार्यवाही न करता बाजु काढुन घेण्याचे काम अजित पवार यांनी केले असुन पुण्यातील उपनगरात किंवा पिंपरी- चिंचवडच्या काही भागात पाण्याचे टँकर आजही दिसुन येतायत. त्यामुळे पुणेकरांना चोवीस तास पाण्याचे गाजर नेमक पुर्ण करणार कोण हे पुढील दिवसात दिसुन येईल.

पहा व्हिडीओ –

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/169871561813267/

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!