🕒 1 min read
परभणी : कोरोनाविरूद्ध या लढाईत रात्रंदिवस परिश्रम करणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या विळख्याने परेशान केले आहे. सद्यस्थितीत थोडे थोडके नाही तर ११२ अधिकारी – कर्मचारी कोरोनायोध्दे उपचार घेत आहेत. या मध्ये 16 अधिकारी, 86 पोलिस कर्मचारी, दहा होमगार्डचा देखील समावेश आहे.
जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दल हादरले आहे. एकीकडे अधिकारी – कर्मचारी योध्दे एकापाठोपाठ एक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यातच ही संख्यासुध्दा चिंता करणारी आहे. कारण वैद्यकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांसारखेच पोलिस दलातील अधिकारी – कर्मचारीसुध्दा कोरोनायोद्ध्याप्रमाणे कार्यक्षेत्रात दिवसरात्र काम करत आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवरून येणारे आदेश, बंदोबस्त, त्यातच या कोरोनाच्या बातम्या या ताण देणारा आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, सततचे लॉकडाऊन त्यामुळे नागरिकांनी होणारी होरपळ त्यामुळे माणूसकीचेही दर्शन घडवण्याची दुहेरी भूमिका पोलिस यंत्रणा बजावत आहे. त्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करत सेवा बजावणे पण स्वत:ला सांभाळून अशी परिस्थिती आहे.
शहरासह जिल्ह्यात बुधवारपासून म्हणजे जमावबंदी व संचारबंदीचा आदेश लागू झाले आहेत. पोलिस प्रशासनावरील जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करणे, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे या गोष्टी अनिवार्य आहेत. त्यामुळेच पोलिस प्रशासनाकडे योग्य त्या सूचना मिळाल्या आहेत. त्या नियोजनातच पोलिस दल व्यस्त आहे. एकीकडे एकापाठोपाठ एक अधिकारी – कर्मचारी कोरोनाने घायाळ होत असताना, ते उपचारासाठी किमान 15 दिवस सुट्टीवर आहेत. कर्तव्यसुध्दा पार पाडण्याची महत्वपूर्ण भूमिका कसरत हे एक आव्हानच कोराेनामुळे उभे राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार


